करूळ केगद धनगरवाडी प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सोडवा महाराष्ट्र क्रांती संघटनेची राज्यमंत्री दत्ता मामा भरनें कडे निवेदनातून मागणी

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७, सिंधुदुर्ग जिल्हा-वैभववाडी तालुक्यातील करूळ केगद धनगरवाडी स्वतंत्र काळाच्या आगोदर पासुन वसलेली असून अजूनपर्यंत तेथील गरीब धनगर समाजाला वन विभागाची जमीन असल्याने रस्ता मिळालेला नाही रस्त्या विना तेथील समाजाला मोठ मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असल्याने व अचानक आजारी झालेली व्यक्ती, गरोदर महिला, सर्प दंश झालेली व्यक्ती रात्री अपरात्री रस्ता नसल्याने डोली अर्थात (पाळण्यातुन) उपचाराकरिता हॉस्पीटलमध्ये जाण्याकरिता मुख्य रस्त्यापर्यंत पोचण्या अगोदरच वेळेतच उपचार न मिळाल्याने कित्येक पीडितांना आपला जीव गमवावा लागला असल्याने या पुढे रस्त्या अभावी कित्येकांना मुत्यूशी झुंज दावी लागणार आहे हा स्थानिक धनगरवाडी समोर प्रश्न उभा असल्याने
शाळकरी लहान मुलांना ही रस्त्या अभावी पावसा पाण्यातून मुठीत जीव घेऊन शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असल्याने तसेच घरामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य वेळेनुसार मिळत नसल्याने वाडीतील नागरिकांचे आतोनात हाल होत असल्याने MKS प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांच्या नेतृत्वाखाली MKS सचिव श्री आर बी बोडेकर, MKS खजिनदार करूळ केगद धनगरवाडीकर श्री राजेंद्र बापू गुरखे, यांच्या उपस्थित दिनांक: २२ जून २०२१ रोजी नामदार श्री दत्तात्रय भरणे साहेब – वने, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय सामान्य प्रशासन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची सदर विषया संदर्भात मंत्रालयमधे भेट घेऊन मंत्री महोदय यांनी जातीने लक्ष घालून करूळ केगद धनगरवाडीच्या भावना समजून घेऊन लवकरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता संबंधीत अधिकारी यांस आदेश देण्यात यावे,अशी मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र क्रांती संघटना-MKS च्या वतीने रस्त्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले व माहिती करिता प्रत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांस पाठविण्यात आली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here