बार्टीचे समतादूत चंद्रकांत इंगळे यांच्याकडून गायिका आम्रपाली पगारेचा सत्कार.

0

येवला : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत पथदर्शी प्रकल्पात येवला तालुक्यात कार्यरत असलेले समता दूत चंद्रकांत इंगळे यांनी तालुक्यातील नांदूर येथील गोड गळ्याची गायिका, वाईस ऑफ नासिक आम्रपाली पगारे हिचा सत्कार केला. नांदूर सारख्या खेडेगावात राहणारी आम्रपाली, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, औपचारीक संगीताचे शिक्षण न घेता तिने गायकीच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. घरात वडिलोपार्जित भिम गिते जलसे, ऑर्केस्ट्रा असा वारसा चालत आलेला आहे. काका अनिल पगारे तिला या विषयी मार्गदर्शन करत असतात. गाणे ऐकून पाठांतर करून कुठलाही क्लास न लावता गायनाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव येथे इयत्ता नववीत शिकत असताना इतक्या कमी वयात संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे. गावातील शाळेत असतांना तिला तिच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले लाभले. व्हाट्सअप फेसबुक यूट्यूब च्या माध्यमातून ती चे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तिची गायकी सर्वांनाच पसंत पडत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या कार्याची दखल घेत येवला तालुक्‍यात समतादूत म्हणून कार्यरत असलेले, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक गीतकार चंद्रकांत इंगळे यांनी नांदूर येथे भेट देऊन रोख रक्कम देऊन तिचा गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर ह्या तिच्या शाळेत तिच्या प्रमुख उपस्थितीत तिच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी…..नांदूर गावचे सरपंच श्री.रामदास शिंदे ग्रामसेवक आहिरे मैडम तसेच श्री.अनिल पगारे..नांदूर शाळेचे मुख्याध्यापक श्री.शंकर आहिरे ,श्री.जाधव सर श्री.चव्हाण सर ,श्री.हिरे सर श्री.शिंदे सर श्री.निकम सर व राठोड मैडम ,तसेच बचत गटाच्या सर्व महिला व नांदूर गावचे गावकरी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here