नगरसेविका आणि खारघर फोरमच्या अध्यक्ष लीना अर्जून गरड यांचे पालिका प्रशासनाला/ महापालिका आयुक्तांना / सत्ताधाऱ्यांना 25 प्रश्न

0

मुंबई – नगरसेविका आणि खारघर फोरमच्या अध्यक्ष लीना अर्जून गरड यांचे पालिका प्रशासनाला/ महापालिका आयुक्तांना / सत्ताधाऱ्यांना 25 प्रश्न:
1. महापालिका हद्दी मधील सिडको कॉलनी एरियाच्या रोडची कामे आणि रस्त्याचे जाळे यांचे काम कोणी पूर्ण केले 2. फूटपाथ चे काम कोणी पूर्ण केले 3. स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे काम कोणी पूर्ण केले 4. Sever / Drainage लाईन चे काम कोणी पूर्ण केले5. संपूर्ण सिडको कॉलनी यांमधील इलेक्ट्रिक पावर सप्लाय आणि स्ट्रीट लाईट चे काम कोणी पूर्ण केले 6. सिडको कॉलनी परिसरातील झाडे कोणी लावली 7. प्रत्येक सेक्टर मध्ये प्लेग्राउंड/ खेळाची मैदाने कोणी तयार केली8. प्रत्येक सेक्टर मध्ये गार्डन कोणी विकसित केले 9. संपूर्ण सिडको कॉलनी एरिया मध्ये नवीन पूल / ब्रीजेस कोणी बांधले10. सिडको कॉलनी वसाहतीमधील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नाले / कॅनॉल कोणी बांधले 11. खारघर मधील उत्सव चौक, शिल्प चौक यासारखी सौंदर्य स्थळे कोणी विकसित केली 12. खारघर मधील स्कायवॉक कोणी बांधला 13. महापालिका परिसरामधील रेल्वे स्टेशनचा ( खारघर, Kamothe, Khandeshwar, Panvel, Taloja) विकास कोणी केला14. महापालिका परिसरात नवी मुंबई मेट्रो चे काम कोण करत आहे15. संपूर्ण सिडको कॉलनी यासाठी किंवा नवी मुंबई करीता खारघर मध्ये सेंट्रल पार्क चा विकास कोणी केला16. सिडको कॉलनी एरिया मध्ये फायर ब्रिगेडची सुविधा तसेच फायर ब्रिगेड च्या गाड्या कोणी तयार केला17. खारघर पोलीस ठाणे, कामोठा पोलीस ठाणे याचे बांधकाम कोणी केले18. सिडको कॉलनी एरिया मध्ये ट्रॅफिक सिग्नलिंग व्यवस्था कोणी तयार केली 19. सिडको कॉलनी एरियामध्ये पाणी वितरण व्यवस्था कोणी तयार केली 20. सिडको कॉलनी एरियाला पाणी देण्यासाठी हेटवणे धरण कोणी बांधले 21. सिडको कॉलनी एरिया मध्ये STP PLANT ची उभारणी कोणी केली22. सिडको कॉलनी एरिया मध्ये बस स्टॉप ची निर्मिती कोणी केली 23. प्रत्तेक सिडको नोडमध्ये कम्युनिटी हॉल कोणी बांधले24. प्रत्येक सिडको नोड मध्ये धार्मिक स्थळासाठी भूखंड कोणी उपलब्ध करून दिले25. संपूर्ण सिडको कॉलनी एरिया म्हणजेच नवी मुंबई करता गोल्फ कोर्स निर्मिती कोणी केली.सर्वात शेवटी महत्त्वाचा प्रश्न या सर्व पायाभूत सुविधाचा मेन्टेनन्स आज पर्यंत कोण करत आहे,वरील सर्व पायाभूत सुविधांचा विकास व निर्मिती सिडकोने केली असून, त्याचा आजच्या तारखेपर्यंतचा मेंटेनन्स सुद्धा सिडको करत आहे.तरी सुद्धा एकही सर्विस महापालिका देत नसताना, निर्लज्जपणे मागच्या पाच वर्षाचा मालमत्ता कर मागत आहे.लाज वाटायला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here