किसान युवा क्रांतीच्या वतीने दूध दरवाढ आंदोलन.

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. ९१३००४००२४: देवळा तालुक्यातील माळवाडी येथे किसान क्रांती संघटनेच्यावतीने दूध दरवाढी साठी आंदोलन करण्यात आले,1लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात सुरू आहे, लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार सुरू आहे, या विषयावरून किसान युवा क्रांती संघटना व इतर समविचार संघटनांनी याविरोधात दि. 17 जून पासून राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता,त्यानुसार आज देवळा तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले ,त्यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी संघटनेची भूमिका मांडली, “पेट्रोल -डिझेल चे भाव गगनाला भिडलेले असताना दुधाचे भाव कमी करणं हे शेतकऱ्याला मातीत घालण्यासारखे आहे, चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव प्रचंड वेगाने वाढत असून ,त्याच पटीत दुधाचे दर वाढायला हवे होते,परंतु दूध संघांकडून मात्र शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी केले जातात व व ग्राहकांसाठी विक्री दर मात्र अजिबात कमी होत नाही हे ही शेतकऱ्यांसाठी व ग्राहकांसाठी अन्यायकारक असून याविरोधात संघटना आक्रमकपणे पावले उचलेल” असं मत गोसावी यांनी व्यक्त केले.त्यावेळी प्रवीण गांगुर्डे, योगेश खैरनार, सुरज आहिरे, अनिकेत जाधव ,खुशाल पवार, विशाल बागुल ,राहुल बागुल, प्रांजल शेवाळे ,किरण कुमावत, प्रकाश भदाने, देवेंद्र बच्छाव, मोहित वाघ, यांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here