तिसऱ्या लाटे साठी सज्जता आवश्यक – आ. चंद्रकांत पाटील

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७: दुसरी लाट ओसरत असताना आरोग्य क्षेत्रातील तज्ञ तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करत आहेत, हे कोरोनाचे संकट कायमचे टळावे अशी प्रार्थना करत आहे मात्र चुकून तिसरी लाट आलीच तर त्यासाठी सज्जता आवश्यक असल्याचे मत आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.पुणे मनपा ने पुरेसे ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारले आहेत व कोविड केयर सेंटर मधे ही वाढ केली आहे मात्र स्वयंसेवी संस्था अश्या सेवाकार्यात महत्वाची भूमिका बजावत आहे हे कौतुकास्पद असल्याचे मत ही चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी दुसऱ्या लाटेप्रमाणे ऑक्सिजन ची कमतरता भासू नये यासाठी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची व्यवस्था करण्यात आली असून अचानक ऑक्सिजन ची पातळी कमी झालेल्या रुग्णास रुग्णालयात बेड मिळून उपचार सुरु होईपर्यंत ह्या कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून ऑक्सिजन पातळी राखण्यास मदत होईल असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष सौ. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे अरुण जिंदल, मुकुल माधव फाउंडेशन चे जितेंद्र जाधव, योगेश रोकडे, प्रशांत हरसूले इ मान्यवर उपस्थित होते. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या व्यवस्थापनासाठी भाजप प्रभाग 13 चे सरचिटणीस श्री. बाळासाहेब धनवे, श्री. निलेश गरुडकर आणि ऍड प्राची बगाटे यांनी नियोजन केले असून हे कॉन्सन्ट्रेटर गरजूना सहज व मोफत उपलब्ध होतील यासाठी कोथरूड मतदारसंघात  व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. बाळासाहेब धनवे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here