मनमाड : रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आठवले)चे पदोन्नतीमधील मागासवर्गीय आरक्षणासाठी मनमाड तलाठी कार्यलयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले,केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवलेसाहेब यांच्या आदेशानुसार 1 जुन पासुन संपुर्ण राज्य भर आंदोलने करण्यात आली .त्याचाच भाग म्हणुन मनमाड येथे व मा.वंदेशजी गांगुर्डे युवक अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र यांच्या नेतृत्वा खाली विश्वभुषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन . मोर्चास प्रारंभ झाला महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करणेबाबत असंवैधानिक जीआर विरोधात, महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी.रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी तर्फे पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने तलाठी कार्यालय परिसर येथे करण्यात आली या आंदोलनात गोरखसेठ चौधरी,संजयशेठ मुनोत ,नाना खरे,मनोज खरात,महम्मदभाई शेख,परवेज शेख,पप्पु शिंगारे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते,मा.वंदेशजी गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष ,आर.पी.आय(आठवले)
Home Breaking News रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आठवले)चे पदोन्नतीमधील मागासवर्गीय आरक्षणासाठी मनमाड तलाठी कार्यलयावर निदर्शने...