
वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो.९१३००४००२४: देवळा- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र नाना पगार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर यांच्या हस्ते खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खर्डे केंद्रासह सहा आरोग्य उपकेंद्रांना वेपोरायझर (वाफ घेण्याचे मशीन) यांचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ नूतनताई आहेर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, माजी भाजपा उपाध्यक्ष निंबाजी निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कनकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्रावण पवार, रामदास गवारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते समाधान देवरे, मुन्ना जाधव, यांचेसह आरोग्य केंद्राचे डॉ. नितीन पगार, डॉ. प्रशांत जाणकर, आरोग्य सेविका नंदिनी भामरे, अनिता सानप, आरोग्य सेवक बाळासाहेब नंदन, प्रशांत सोनवणे, दादा पवार, महेश पाटील, प्रवीण पाठक, लिपिक शरद शिरसाठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ दीपक जाधव आदी उपस्थित होते.
