कोरोना व तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्याची खा.डॉ.भारती पवार यांनी घेतली आढावा बैठक

0

दिंडोरी : कोरोनाची दाहकता कमी होण्यास एकीकडे सुरुवात झाली असताना तौक्ते वादळाने धडक दिल्याने अनेक ठिकाणी शेतीचे, फळबागांचे, घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर खा.डॉ.भारती पवार यांनी दिंडोरी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पंचायत समितीच्या सभागृहात बोलावली होती. यात सर्वप्रथम कोरोना संक्रमणाच्या बाबतीत आढावा घेऊन सध्या कोरोना बाधित किती रुग्ण आहेत, उपचार घेऊन किती रुग्ण घरी गेले आहे. सद्यस्थितीत घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या व त्यांची माहिती घेत सध्या विलगिकरण कक्षात असलेल्या रुग्णांचीही माहिती घेतली. म्युकरनायकोसिस आजाराबाबत वाढत्या रुग्णांची पण काळजी घेण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना करत अशा रुग्णांना पुढील उपचारांसाठी नासिक येथे पाठवावे व प्राथमिक उपचारासाठी त्यांना औषधे उपलब्ध करून घ्यावे , कोव्हीड लसिकरणासाठी सद्या किती लसीकरण केंद्रे कार्यरथ असून तेथील केंद्रांवर आतापर्यंत किती लसीकरण झाले आहे याची माहिती घेतली .अजूनही नागरिकांमध्ये लसीकरण अधिकचे व्हावे म्हणून जनजागृती होणे गरजेचे असून स्थानिक गाव कमिटीला बरोबर घेऊन गावातील व परिसरातील नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचा सूचनाही खा. डॉ. भारती पवार यांनी केल्या.
तदनंतर दिंडोरी तालुक्यात पाणी टंचाईची सद्य स्थिती जाणून घेतली व जिथे जिथे टंचाई जाणवतेय तिथे तिथे पाणी टँकर्स ची उपलब्धता करावी तसेच केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन या महत्वपूर्ण योजनेचे प्रस्ताव तयार करून ही योजना प्रत्येक गावात तातडीने राबविण्याच्या सूचना केल्या. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू झाली असून त्यांना बी बियाणे उपलब्ध करून द्या तसेच खतांच्या किमतीबाबत चर्चा झाली असतांना जादा दराने खत विक्री होऊ नये म्हणून खतांच्या दुकानाबाहेर खतांच्या किमतीचे बोर्ड लावण्याचा सूचना केल्याअसून शेतकऱ्यांना यासंबंधी काही अडचण आल्यास कृषी अधिकाऱ्यांनी त्याचे निरसन करावे .तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली व त्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीची मदत देण्याच्या सूचना केल्या. या वादळामुळे विज वितरण महामंडलाच्या नुकसानीची माहिती घेतली अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून विजेच्या ताराही तुटल्या आहे त्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युतप्रवाह खंडित झाला असून तो लवकरात लवकर सुरळीत करावा . लॉकडाऊनच्या काळात रेशनिंग चे वाटप योग्य पद्धतीने झाले की नाही याचीही माहिती घेत कुपोषित बालकांकडे त्यांच्या सकस आहाराकडे लक्ष देण्याची गरज असून त्यांना सकस आहार पुरवावा. मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावी .त्यात अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण असून ती त्वरित पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर सर्वच गोष्टींचे नियोजन आपण सर्वांनी करा असे प्रतिपादन खा.डॉ.भारती पवार यांनी ह्या बैठकीप्रसंगी केले. आढावा बैठक संपल्यानंतर खा.डॉ.भारती पवारांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर ला भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस केली. सदर बैठकीस प्रांत संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कुशारे, कृषी विभागाचे डी. सी. साबळे, येस. डी. बागुल, जमदाडे साहेब, डी. डी. ह्यातनगरकर,दिंडोरी पोलीस निरीक्षक अनंत तारगे ,वणी पोलीस स्टेशन निरीक्षक राजपूत साहेब. सहाय्यक निबंधक चंद्रकांत विहाते, वीज महावितरण चे सुनील राऊत, सामजिक बांधकाम अभियंता डी. एम. देशमुख, नगरपालिका अभियंता एस. एस. पाटील, पाटबंधारे विभागाचे तुषार जोशी, भूमी अभिलेख चे विपीन काजळे, वनपाल आर. व्ही. देवकर, BSNL च्या मनीषा पाटील, पाणी पुरवठा विभागाचे येस. बी. पाटील. इवद चे संजीव पवार यांचेसह भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, शाम मुरकुटे, भाजपा नेते प्रमोद देशमुख,सरपंच योगेश बर्डे, योगेश तिडके, कुंदन जावरे, रणजित देशमुख ,गंगाधर निखाडे यांचेसह अनेक पदाधिकारी व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here