युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णा ताई कदम यांचा वाढदवसानिमित्त युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत च्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित

0

मुंबई – युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णा ताई कदम यांचा वाढदवसानिमित्त युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत च्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्या नुसार ठाणे,दिवा,मुंब्रा,भिवंडी परिसातील विविध पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना महामारी कोवीड काळात जनतेच्या पाठीशी खंबीर पने उभे राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना भारताचे संविधान प्रत, सन्मान पत्र,मास्क,शाल, श्रीफळ व आभार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यात मुंब्रा पोलीस स्टेशन महिला पोलीस निरीक्षक माधुरी जाधव,ठाणे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विद्या पाटील,भिवंडी कोनगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांचा समावेश होता व संघटने तर्फे पोलीस बांधवांना आश्वासन दिले की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत UHRC संघटना त्यांच्या बरोबरीने सामाजिक कार्य करेल तसेच श्री.कुंदन पाटील आरोग्य व बांधकाम सभापती ठाणे  यांचा ही संघटने तर्फे सन्मान करण्यात आला त्यानंतर भिनार कोविंड सेंटर,भिवंडी इथे डॉक्टर राहूल नरवडे यांची भेट घेऊन तेथील रुग्णांना मास्क,फळ वाटप करण्यास सुपूर्द करून त्यांना सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी UHRC चे महाराष्ट्रराज्य संघटन मंत्री ओमकार खानविलकर,विजय चिकुरडेकर सर,सौ.सुजाता सावंत,ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटील,कल्याण तालुका अध्यक्षा सौ.सुनिता अडसूळ, त्यांचे पती श्री.उमाकांत अडसूळ,दादर ब्लॉक अध्यक्ष सचिन जोईजोडे,चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्षा सौ.वसुधा वाळुंज, सदस्य पिंकी गुप्ता,ठाण्याचे राजेश यादव  यांचा समावेश होता व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here