शिक्षकी पेशा हा सर्वोच्च पेशा मानणाऱ्या प्र. के. अत्रे यांच्या आठवणींना वसंत व्याख्यानमालेत मिळाला उजाळा

0

देवळा – शिक्षकी पेशा हा सर्वोच्च पेशा मानणाऱ्या प्र. के. अत्रे यांच्या आठवणींना वसंत व्याख्यानमालेत मिळाला उजाळा.शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, नाटक आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वी मुशाफिरी करणारा अवलिया म्हणजे अत्रे! अद्वितीय प्रभुत्व गाजवून एका विशिष्ट कालखंडात महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य अत्रे यांच्या जीवनाचे विविध पैलू वसंत व्याख्यानमालेच्या पाचव्या पुष्पात दिनांक २० मे २०२१ उलगडण्यात आले.
अत्र्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची श्रोत्यांना ओळख करून देताना नंदकिशोर दळवी आणि अनुजा पाटील यांनी अनोख्या पद्धतीने संवाद साधत आंतरजालावर सादरीकरणाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. अत्रेंच्या बालपणातील काही गमतीदार किस्से, त्यांच्या आयुष्यातील अनुभव – प्रसंग, त्यांचे हितचिंतक, त्यांना आलेले विविध क्षेत्रांतील चांगले वाईट अनुभव, त्यांची विनोदबुद्धी, जनसामान्यांवर त्यांच्या भाषणांचा प्रचंड प्रभाव, विविध क्षेत्रांतील त्यांची कामगिरी, त्यांच्या ठायीचे नैपुण्य इत्यादी गोष्टींचा प्रसंगानुरुप सहज सोप्या भाषेत उल्लेख केला. आचार्य अत्रे यांच्या हृदय आठवणींची मैफिली याप्रसंगी सुंदर रंगली. कांदिवली पूर्वचा आचार्य अत्रे कट्टा आणि चाणक्य नगर जेष्ठ नागरिक संघ यातील सर्व सक्रिय गुणी सभासद तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून रसिक श्रोते उपस्थित होते. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री भाई चिंदरकर सर यांनीही अत्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला.सदर कार्यक्रमाचे ओघवते सुंदर सूत्रसंचालन सौ. मनिषा सुनील घेवडे यांनी केले. मंजुळ आवाजात प्रास्ताविक करून सौ. सुनिता गोळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तांत्रिक जबाबदारी सांभाळणाऱ्या सौ. शलाका कारकर मॅडम यांनी अतिथींचा सुंदर परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनांनी आभार मानून श्री भदाणे सर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. भाषा संवर्धन समितीच्या आयोजन समितीतील प्रत्येक सदस्याचे मोलाचे सहकार्य लाभले.धन्यवाद,महेश्वर तेटांबे
९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here