सिल्लोड तालुक्यातील केळगाव मुर्डेश्वर मंदीर परिसरातील डोंगरात आढळला लटकलेला मानवी सापळा

0

सिल्लोड प्रतिनिधी/ विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालूक्यातील केळगाव परिसरातील मुर्डेश्वर शिवारामध्ये आज दि/18/5/21 रोजी एका सागाच्या झाडाला मानवी देहाचा सांगाडा लटकेला आढळ्याने खळबळ उडाली आहे.सकाळी दहा वाजेदरम्यान परिसरातील वनमजूर जंगलात गस्त घालत असतांना त्यास सागाच्या झाडाला मानवी देहाचा सांगाडा लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वनमजूराने हि माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीसांना दिली घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रल्हाद मुंढे यांनी सहकार्यासह घटनास्थळी दाखल होऊन सदरील घटनेची पाहणी केली आसता सदरील सागाच्या झाडाजवळ मयताच्या शर्टच्या खिशात बंद मोबाईल आधारकार्ड व डायरी,व लाकडी काठी सापडली या आधारकार्वरून सदरील मयत ईसम तालूक्यातीलच मोढा. बु येथील असल्याचे निष्पन्न झाले.सदरील व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलीसांनी बांधला आहे.सदरील मयत व्यक्तीचे नाव/ शंकर पांडु महाकाळ वय ७५ रा मोढा ता सिल्लोड हे एप्रिल महिण्याच्या दि.१५ रोजी मोढा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने सिल्लोड ग्रामीण पोलीसांना दिली होती.तब्बल एक महिण्यानंतर बेपत्ता ईसमाचे प्रेत सांगाड्यात सापडल्यामुळे चर्चेला उधान आले आहे. पोलीसांनी पाहणी करून प्रेताची ओळख पटवून आमठाणा प्राथमीक आरोग्य केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी मोरे मॅडम यांनी घटनास्थळावर शवविच्छेदन केले असून नेमका हा प्रकार काय आहे हे तपासा अंती कळेल.या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here