छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने Instagram live च्या माध्यमातून जयंती साजरी

0

वासोळ : प्रतिनिधी प्रशांत गिरासे,काल १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने शिवरुद्रसेवा परिवाराने अनेक उपक्रम राबविले होते. Covid १९ चा प्रादुर्भाव बघता सोशल distancing चे नियम पाळून ऑनलाईन पद्धतीने instagram live च्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली.जयंती निमित्त गेल्या महिनाभरापासून परिवाराने ऑनलाईन गडकोटांवरील फोटो सादरीकरण स्पर्धा राबविलेली होती व तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा राबविलेली होती. १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता शिवव्याख्याते संजयजी लगड छत्रपती संभाजी महाराज नगर यांचे लाईव्ह व्याख्यानाचा कार्यक्रम परिवाराच्या instagram page वर राबविण्यात आला. संभाजी महाराजांचा इतिहास व तसेच जीवनप्रवास संजय लगड यांनी मांडला. आजच्या तरुणांसाठी संभाजी महाराज हे सगळ्यात मोठे आदर्श आहेत अशा शब्दात परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिव शंभु व्याख्याते आशिष पगार यांनी तरुणांना आवाहन केले. आणि तसेच लाईव्ह च्या माध्यमातून आशिष दादा आणि संजयजी लगड यांच्या हस्ते दोनही स्पर्धांचे निकाल लावण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष हेमंत दादा माळी, सचिव गोपाल दादा देशमुख, कार्याध्यक्ष विशाल दादा दिघे, सुरज दादा पाटील, आदित्य दादा हाडे, पवन दादा पाटील, चारुदत्त दादा बोरसे व इतर कौर कमिटी सदस्य व तालुका जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here