परिचारिका सन्मान कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोउद्गार

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,सध्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत डॉक्टरांसोबत परिचारिका ही प्रचंड मेहनत घेऊन आपली सेवा देत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला डॉक्टरांसोबतच परिचारिका ही देवदूतच आहेत, असे गौरवोद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. कोथरूड मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. हर्षदा फरांदे यांनी आज महिला मोर्चाच्या वतीने पुण्यातील एस.एन.डी.टी महाविद्यालय परिसरात परिचारिकांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी श्री. पाटील बोलत होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार हे देखील कोरोना काळात विविध उपक्रम राबवित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, सरचिटणीस व नगरसेवक दीपक पोटे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, माधुरी ताई सहस्रबुद्धे, जयंत भावे,अल्पनाताई वर्पे, कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, महापालिकेचे सहाय्य्क आयुक्त संतोष वारुळे, डॉ पखाले, डॉ. अरुणा तारडे, डॉ.एक्के यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, सध्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत ही डॉक्टरांसोबत परिचारिका ही प्रचंड मेहनत घेऊन आपली सेवा देत आहेत. त्यामुळे ते देखील डॉक्टरांप्रमाणेच आरोग्य सेवेतील परिचारिका देखील देवदूत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, सध्या भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि आमदार वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवा करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर संपूर्ण पुणे शहरात ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवू लागला. यानंतर माझ्या शहर भाजपाच्या माध्यमातून २००० ऑक्सिजन बेड्स उभारण्याच्या आवाहनानंतर; पुण्यातील सर्व आमदार आणि नगरसेवकांनी आपापल्या भागात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याचं काम सुरू केले. तसेच पुण्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने दहा हजार बॉटल्स रक्त संकलनाचा संकल्प केला. त्यानंतर अनेक नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करुन जवळपास सहा हजार बॉटल्स रक्त संकलित केले. मोठ्या प्रमाणात रक्त संकलनामुळे ब्लड बॅंकांकडे रक्त संकलनासाठीची व्यवस्था अपूरी पडू लागली. त्यामुळे आपण हे रक्त संकलन अभियान तात्पुरत्या स्वरूपात थांबवले. याशिवाय अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्लाझ्मा दानाचे देखील उपक्रम राबविले आहेत. तसेच सर्वांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहेत.या कार्यक्रमावेळी कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आयुष-६४ च्या गोळ्यांचे वाटप ही डॉक्टर आणि कोविड योद्ध्यांना करण्यात आले.यावेळी मंडल सरचिटणीस गिरीशजी भेलके, उपाध्यक्ष राजजी तांबोळी, स्विकृत सदस्या मितालीताई सावळेकर, प्रभाग १३ अध्यक्ष राजेंद्र येडे, कोथरुड महिला मोर्चा सरचिटणीस सुरेखाताई जगताप, गायत्रीताई काळभोर, केतकीताई कुलकर्णी, उपाध्यक्ष पल्लवीताई गाडगीळ, सुप्रियाताई माझीरे, चिटणीस रमाताई डांगे, प्रसिद्धी प्रमुख कल्याणीताई खर्डेकर, अमोलजी डांगे, दिपकजी पवार,संगीताताई शेवडे,रामदासजी गावडे, निशिकांत भोमे, सौमित्र देशमुख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here