मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा सिंधुदुर्ग पोईप खोटले धनगरवाडीचा रखडलेला रस्ता पूर्णत्वास न गेल्यास आंदोलनाचा इशारा MKS प्रमुख श्री पी बी कोकरे

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७- पोईप खोटले धनगरवाडी ही ता. मालवण जिल्हा, सिंधुदुर्ग येथील असून सदरील रस्ता सुधारणा व मजबुतीकरण अर्थात (खडीकरण-डांबरीकरण) करण्याचेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे फलक रस्त्याच्या बाजूलाच लावण्यात आलेले असून त्या फलकावर नमूद केलेल्या माहितीनुसार दिनांक ०३/७/२०१९ रोजी रस्त्याच्या मजबुती कार्याचा आरंभ करण्यात आला असून कामकाज पूर्ण करण्याची अंतिम तारीख ०२ एप्रिल २०२० पर्यंत होती सदरील रस्त्याची लांबी ५.२०० की. मी. असून रस्त्यासाठी तब्बल ३८५.६१ लक्ष निधि उपलब्ध झालेला असून सदर रस्त्याच्या कामाचे ठेकेदार श्री देवदत्त जनार्धन सामंत हे आहेत सदरील पोईप खोटले धनगर वाडीच्या रस्ता सुधारणा व मजबुतीकरण करण्याची कामाची मुदत संपलेली असूनही रस्ता मात्र अपूर्णच आहे त्याच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या वाडीसाठी पाणीपुरवठा व्हावा याकरिता नळ योजनेची लाईन देण्यात आलेली आहे ती नळ योजनेची लाईन याच रस्त्याच्या मधून गेलेली असता रस्त्याचे कामकाज करते वेळी ठेकेदाराने तोडलेली आहे ती अद्याप जोडण्यात आलेली नाही याचाच अर्थ एक वाडी रस्त्याविना वंचित तर दुसरी वाडी पाण्याविना वंचित ठेवण्याचे काम संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी केलेले आहे. पोईप खोटले ग्रामस्थांनी सदरील रस्त्याचे काम अजून का अपूर्ण आहे असे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांस विचारणा केली असता योग्य उत्तरे न देता उडवाउडवीची बेजबाबदार उत्तरे देण्यात आली असून स्थानिक जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री साहेब,स्थानिक आमदार,खासदार, पालकमंत्री,विरोधी पक्षनेते,बांधकाम विभाग,ग्रामविकास,जिल्हा परिषद,जिल्हाधिकारी,व इतर ठराविक नेते यांनी रस्त्याच्या कामी जातीने लक्ष घालून संबंधित अधिकारी व ठेकेदार याना तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा आदेश देण्यात यावा.असे लेखी निवेदनातून कळविण्यात आले असून रस्त्याचे खोदकाम करतेवेळी मोठं मोठे खड्डे पाडून ठेवल्याने तिथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना व मुक्या जनावरांना नाहक त्रास होत आहे.पुढे पावसाळा असल्याने खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे,त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यास जबाबदार कोण ?अशा बेजबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदारावर योग्यती पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात यावा.अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या कामास सुरवात करून रस्ता पूर्णत्वास न गेल्यास महाराष्ट्र क्रांती संघटना स्थानिक ग्रामस्थ याना सोबत घेऊन आंदोलन अथवा आक्रमकपणे रस्त्यावर उत्तरेल या सर्व बाबीला बेजबाबदार अधिकारी व ठेकेदार प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here