
वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. ९१३००४००२४: देवळा तालुक्यातील फुलेनगर(वासोळपाडे)येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिरास ४५ वर्षांवरील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.दिवसभरातून तब्बल १९७ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली.फुलेनगर गावात लसीकरण शिबिर आयोजित व्हावे यासाठी पोलिस पाटील कैलास खैरनार यांच्या अथक प्रयत्नांनी वेळोवेळी आरोग्य यंत्रणेकडे पाठपुरावा केला. पोलीस पाटील यांनी वाढदिवसा निमित्त घरोघरी जाऊन जनजागृती केली. येथील सरपंच रंजना खैरनार यांनी प्रथम लसीचा लाभ घेतला.लसीकरण शिबिर यशस्वीतेसाठी वासोळ येथील आरोग्य वर्धणी उपकेंद्राचे आरोग्य सेवक डॉ.महेश सुर्यवंशी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राकेश मिसर,आरोग्य सेविका वंदना बच्छाव, उपसरपंच सतिश बागुल,ग्रामसेवक अर्चना सोनार,अशासेविका हिरुबाई खैरनार,अंगणवाडी सेविका मनीषा शेवाळे मदतनीस मेघा बागुल, ग्रामपंचायत कर्मचारी अभिजित बागुल,वामन बागुल,गणेश अहिरे,आदींसह ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले.
