
मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती मोहिम सुरू करण्यात आली आहे.त्या अंतर्गत आज वृंदावन कॉलनी, आर.टी.एस.कॉलनी व पंचवटी कॉलनी या परिसरात झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्मिक अधिकारी आयु.कुलकर्णीसाहेब व एजाज सैय्यद हे होते.रॅली चे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड,शरद झोंबाड,सचिन इंगळे, नवनाथ जगताप, सुनिल सोनवणे, फकिरा सोनवणे,गणपत गायकवाड,दिपक अस्वले, अर्जुन बागुल, निखिल सोनवणे, राकेश ताठे, प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे, बलराम सिंह, दिपक गुप्ता आदीने केले.
