
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कारखान्यातील टाइम बुथ जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ जोगदंड, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड आदी उपस्थित होते.कारखान्यातील जेष्ठ महिला कर्मचाऱ्यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी सचिन इंगळे,रतन निकम, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद झोंबाड यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्याण धिवर यांनी केले.दरवर्षी कारखान्यांमध्ये १३एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असे पण या वर्षी असोसिएशन ने कोरोणाचे गांभीर्य ओळखून स्नेह भोजनाला फाटा देऊन कारखान्यांतील प्रत्येक कामगारांला आपल्या कामाच्या ठिकाणी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून मास्क वाटप केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, सुनिल सोनवणे,सागर साळवे, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्रभाऊ पगारे, संदिप पगारे, सचिन इंगळे, हर्षद सुर्यवंशी, दिपक अस्वले, विनोद खरे, निखिल सोनवणे, विशाल त्रिभुवन, किरण वाघ, फकिरा सोनवणे, अनिल अहिरे, संतोष शिलावट, प्रभाकर निकम, अर्जुन बागुल, पंढरीनाथ पठारे,नदिम सैय्यद, साईनाथ लांडगे, अध्युद्य बागुल आदी ने परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाच्या वेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
