मौजे.मांजरवाडी , सुभाषनगर येथील वीज समस्येमुळे शिवार पाहणी

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: मौजे. मांजरवाडी व सुभाषनगर शिवारात जिल्हा परिषद सदस्य सौ नूतनताई सुनील आहेर यांना शिवार पाहणी करत असताना मांजरवाडी येथेअपुरा वीज पुरवठा व रोहित्रावर असणारा अतिभार यामुळे वेळोवेळी विजेची समस्या निर्माण होते अशी माहिती यावेळी स्थानिकांनी दिली. यामुळे स्थानिक शेतकरी बांधवांनी दुसऱ्या नवीन विद्युत रोहित्राची मागणी केली असता याबाबत संबंधित अधिकारी वर्गास भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून सदर परिस्थितीची माहिती देऊन नवीन विद्युत रोहित्र तत्काळ बसविण्यात यावे अशा सूचना वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नुतनताई सुनिल आहेर यांनी दिल्या.याप्रसंगी देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल (गोटुआबा) आहेर, वायरमन भूषण भदाणे, भगवंत गुंजाळ, दशरथ पुरकर, जयवंत जाधव, सुधाकर खैर, बाळासाहेब शिंदे, रवींद्र पुरकर, समाधान पुरकर, सोनू खैर, मंगेश जाधव,पप्पू वाघ,भगवान पगार, शशिकांत पगार,सुखदेव पगार, मन्साराम गुंजाळ, सुधाकर बच्छाव, हिरामण शिंदे,सतीश जाधव, परशुराम मेधने आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here