
मुंबई – सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी महामंडळाच्या रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई २५ येथील कार्यालयात दीड दिवस “माघी गणेशोत्सव” व ‘”श्री.सत्यनारायण पूजेचे” आयोजन करण्यात आले होते. यां सोहळ्याला मुंबई एकी ग्रुप चे सदस्य तसेच प्रसिद्ध कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आवर्जुन उपस्थित होते. माघी गणेशोत्सवाचे आयोजन,करण्यामागे एकच ध्येय की मुंबईतील सर्व कलावंत, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा निर्माण केला पाहिजे. सभासदांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत त्यासाठी विचारांची देवाणघेवाण होणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर सभासदांच्या समस्या त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देणे इत्यादी महत्वाच्या कार्यात तत्परता दाखवली पाहिजे याच हेतुपुरस्सर हा माघी गणेशोत्सव साजरा करून सात्विक आणि भावनिक आनंद द्विगुणित केला पाहिजे तरच श्री गणेशाची कृपादृष्टी आपल्यावर राहील. यां माघी गणेशोत्सवात नेहमीप्रमाणे मुंबई एकी समूहातील सदस्यांची वर्णी जास्त संख्येने होती.
याप्रसंगी महामंडळाच्या संचालिका तसेच प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, महामंडळाचे उपाध्यक्ष विजय खोचीकर, सह-कार्यावह चैत्राली डोंगरे, प्रसिद्ध विनोदी अभिनेते चेतन दळवी, ज्येष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे, दिग्दर्शक सतिश रणदिवे, पत्रकार महेश्वर तेटांबे, दिग्दर्शक विजय राणे, दिग्दर्शक दिपक कदम, दिलीप दळवी, दिग्दर्शक मनिष मेहेर आदी महामंडळाचे पदाधिकारी, सभासद त्याचप्रमाणे कर्मचारी विशाल पवार, हेमंत परब, अंकिता कदम, कविता डांगे, गीता काकी परब आदी मान्यवर उपस्थित होते.धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे,सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार
९०८२२९३८६७
