ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे माताश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे माताश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ओपन लाईन चे सचिव रत्नदीप पगारे , कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे व बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी सतिष भाऊ केदारे, संदिप धिवर, सचिन इंगळे,सागर साळवे,आदी चे भाषणे झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला व मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सम्राट गरूड यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप,शरद झोंबाड, कुणाल मोरे, विनोद खरे, साईनाथ लांडगे,सागर साळवे, किशोर खंडागळे, राजु सोनवणे, श्यामबाबु पासवान, राहुल शिंदे, प्रेमदिप खडताळे, सुरेश अहिरे, विनोद अढागळे, प्रदीप आहिरे,निरजकुमार,निवासकुमार पासवान, सुरेंद्र कुमार, शिवशंकर कुमार, आदीने केले.कार्यक्रमाच्या शेवटी खिरदान करण्यात आले तसेच कारखान्यांतील कर्मचारी आयु.बलराज यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here