सिल्लोड-प्रतिनिधी विनोद हिंगमिरे -सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील युवकांनी मंगळवार रोजी राष्ट्पती पुरस्कार प्राप्त आदर्श पाटोदा गावास भेट दिली सद्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावात राजकीय वातावरण तापू लागले आहेत शासनाने अगोदर आरक्षण जाहीर करून रद्द केले यामुळे अनेकांचा हिरमोड झाला मात्र आता निवडणुकीच्या नंतर आरक्षण होणार असल्याने पॅनल मधील सर्वच उमेदवार सरपंच होण्याचे स्वप्नं बघत आहेत, तसेच या निवडणुकीमध्ये सुशिक्षित तरुणांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येत आहे आणि प्रत्येक पॅनल गावाचा सर्वांगीण विकास करणार असे सोशल मीडिया, व आदर्श गावांना भेट देऊन आपणही असे करू असे व्हिजन गावासमोर मांडताना दिसत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावास तळणी येथील ग्रामस्थनी भेट देऊन गावाची पाहणी करून सरपंच पेरे यांच्या शी संवाद साधला गावची माहिती देताना पेरे पाटील यांनी सांगितले की शासकीय अधिकऱयांनी मनापासून काम केले तर गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही, गावाचा विकास करण्यासाठी निधीची फार आवश्यकता आहे त्यामुळे गावातच निधी उभा करायला हवा असं सांगत पाटोदा गावच्या अभिनव करवसुली उदाहरण त्यांनी मांडले, गावाचा विकास करायचा असेल तर लोकसहभाग असणे गरजेचे आहे गावात राबविलेल्या योजनाबद्दल सांगताना गावात 100%कर भरला जातो कराची रक्कम फक्त धनादेश दरे स्वीकारले जाते, यामुळे लोकांना बँकिंग व्यवहार समजतो, करियर गाईडन्स केले जाते, गावात खाजगी, आणि सार्वजनिक शौचालय आहेत, शुद्ध पिण्याचे पाणी व सोलरचे गरम पाणी कुटुंबाला दिले जाते, भारतातील पहिला प्रयोग, मोफत पीठ दळून दिल्या जाते, ग्रामपंचायत मार्फत अर्ध्या किंमतीत नांगरणी केली जाते गावात,झाडे वाढी लावलेत, या सर्व सुविधा जे कुटुंब पूर्ण कर भरेल त्यालाच मिळतात असे सांगितले यावेळी, संतोष सोनवणे, सागर राजपूत, अमोल ठोंबरे, संजय वाघ,गणेश ठोंबरे संतोष वाघ, बाळू,गणेश गरूड, वाघ, उमेश वाघ, कृष्णा ठोंबरे डॉ मंजित गोंगे, जनार्धन ठोंबरे, दत्ता आढाव, शरद विसपुते, रामेश्वर गरूड, तेजराव ठोंबरे, जगन साळवे, विजय विसपुते,गजानन ठोंबरे, योगेश सोनवणे,लक्ष्मण ठोंबरे,गजानन वाघ याची उपस्थिती होती