मनमाड येथील पत्रकार सतीश परदेशी संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी दिंडोरी लोकसभा खासदार भारतीताई पवार यांच्याकडून शुभेच्छापत्र..

0

मनमाड – मनमाड येथील राहणारे पत्रकार सतीशसिंग परदेशी यांनी आपल्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रातील एकमेव दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच सक्षम पोलीस टाईम,दै.पोलीस शोध,दै.शब्दराज,दै.श्रीरामभुमी, राज्य दै.बाळकडू तसेच जनमत मराठी न्युज वाहिनी या प्रसार माध्यमांकरीता अहोरात्रपणे काम करणारे मनमाडचे पत्रकार सतीश रतन परदेशी एकमेव पत्रकार असून ते अनेक वर्षापासुन पत्रकारीता क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.शेतकरी,कामगार, विद्यार्थी,महिला तथा युवकांच्या विविध सामाजिक,राजकिय, शैक्षणिक तसेच धार्मिक प्रश्नांसाठी अहोरात्रपणे कार्य करत आहेत.त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता तळागाळातुन वेळोवेळी सर्व सामान्यांपर्यंत जनमत न्यूज चैनलच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्राच्या व ई – पेपरच्या माध्यमातुन प्रत्येक बातमी पोहचविण्याचे बहुमोल कार्य करत आहेत.आपण जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मनमाड येथे नगीना कॉम्प्लेक्स्च्या बाजुला जयश्री टॉकिज शेजारी पत्रकार श्री.सतीश रतन परदेशी संपर्क कार्यालय सुरू केले तसेच आपणास राज्य दै.बाळकडु या वृत्तपत्रामध्ये नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणुन निवड झाल्याबद्दल दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय डॉ. भारतीताई पवार यांनी एका विशेष पत्राद्वारे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन करून भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकाकडून शुभेच्छाचा देखील वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here