येवला येथे सिकलसेल आजार संदर्भात जनजागृती

0

येवला -येवला तालुका शशिकांत जगताप पाटोदा पी एस सी अंतर्गत धुळगाव उपकेंद्र याठिकाणी राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या वतीने व आशा स्वयंसेविका यांच्या उपस्थितीत गावातील गरोदर माता किशोरवयीन मुली तसेच वयोवृद्ध महिला यांची सिकलसेल आजार संदर्भात रक्त नमुने घेऊन तपासणी करून या सिकलसेल आजार संदर्भात जनजागृती करण्यात आली,सिकल सेल आजार हा अनुवंशिक व रक्तपेशी संबंधित असल्याने थकवा येणे चक्कर येणे हात पाय दुखणे हात पाय सुजणे जास्त दिवस खोकला बारीक ताप ही लक्षणे दिसून येत असल्याने गरोदर माता च्या बाळाला सिकल सेल आजार होण्याची दाट शक्यता असल्याकारणाने भविष्याच्या दृष्टीने किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती करून या आजाराची तपासणी करणे गरजेचे आहे म्हणून उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी कुमारी डॉ. आफिया फाजली, आरोग्य सेवक डॉ. भालेराव तसेच आशा स्वयंसेविका जगताप वालहु बाई, सविता आहेर संगीता राजगुरू सुनिता राजगुरू या आशा स्वयंसेविका सह पुनम खोडके, राणी गायकवाड ,सोन्या बाई मांजरे रूचीता गायकवाड तनुजा गायकवाड शितल ठाकरे अवंतिका जगताप यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here