सामाजिक कार्यकर्ते श्री.अमोल वंजारे यांची सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेवर मुंबई महासचिव पदी नियुक्ती.

0

मुंबई – मुंबई ठाणे जिल्हा UHRC टीमच्या वतीने आणि युनिव्हर्सल ह्यूमन राईट काऊन्सिल चे राष्ट्रीय अध्यक्ष तरुण बाकोलीया, राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ.सुमन जी मौर्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष गजानन शिंदे, राष्ट्रिय महासचिव महाराष्ट्र व गुजरात राज्य प्रभारी डॉ.मनीष जी नेरूरकर, राष्ट्रीय संयुक्त सचिव विजय संकपाल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुहास सावर्डेकर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ.सुवर्णा कदम यांच्या आदेशाने आणि तसेच संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिन व युनिव्हर्सल ह्यूमन राईट काऊन्सिल संघटनेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आनंद केंद्र ट्रस्ट, डॉ.अन्नी बेझंट रोड, अट्रिया मॉल च्या बाजूला, लोटस कॉलनी, वरळी, मुंबई- ४०००१८ येथे अनाथ मुलांना दुपारचं भोजन देऊन प्रत्येक मुलाला वह्या, पेन, पेन्सिल चे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अक्षरा सामजिक प्रतिष्ठान यां सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष – सामजिक कार्यकर्ते श्री.अमोल ज्ञानदेव वंजारे यांच्या सामाजिक आणि उल्लेखनीय कार्याची योग्य ती दखल घेऊन त्यांची मुंबई महासचिव पदी अधिकृत रीत्या नियुक्ती करुन मुंबई अध्यक्ष हिमांशू शाह यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्य संघटक ओंकार खानविलकर, ममता सावंत, महाराष्ट्र राज्य सचिव ऍड.सुनिल पाटील, महिला ठाणे जिल्हाध्यक्ष पल्लवी गोपाळ, मुंबई सचिव जितेंद्र दगडू सकपाळ, मुंबई उपाध्यक्ष शाम भिंगरदिवे, असिफ गौरी, दादर ब्लॉक अध्यक्ष सचिन जोईजोडे, वडाळा ब्लॉक अध्यक्ष ऍड.संतोष आंबेरकर, चिंचपोकळी ब्लॉक अध्यक्षा वसुधा वाळुंज, उल्हासनगर ब्लॉक अध्यक्षा रेखा सराफ, परेल ब्लॉक अध्यक्ष अनिल शिंदे आदीं मान्यवर उपस्थित होते.महेश्वर भिकाजी तेटांबे,सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here