कर्णकर्कश आवाजात धूम स्टाईल मोटारसायकली पळविणाऱ्याची गय केली जाणार नाही

0

सिल्लोड प्रतिनिधी ( विनोद हिंगामीरे )
कर्णकर्कश आवाजात धूम स्टाईल मोटारसायकली पळविणाऱ्याची गय केली जाणार नाही अश्या गाड्या बाबत पोलिसांना माहिती द्या असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी केले आहे
दोन दिवसांपूर्वी दैनिक Mb news 24tass ने सिल्लोड शहरात कर्णकर्कश आवाजांच्या वाहनांपासून नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते या वृत्ताची शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी स्वतः दखल घेतली असून
शहरातील मुख्य रस्त्यावरून दररोज काही युवक कर्णकर्कश आवाजांची वाहने शहरातून भरधाव वेगाने पळवणार्‍या वर ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनांसह विना क्रमांकाची वाहने तसेच कागदपत्र अपूर्ण असणारी वाहने यावर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच वाहनधारकांवर हा कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे अशा वाहनांन बाबत नागरिकांनी माझ्या 9823508686 या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here