
सिल्लोड ( प्रतिनिधी-विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील शेतकऱ्याच्या घराला काल रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही काल शुक्रवार मध्यरात्रीच्या सुमारास उपळी येथील वागदा वाडी वरील शेतकरी भरत सिंग डायलॉग सिंग राजपूत यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले प्रसंग प्रसंगावधान राखून घरातील गॅस सिलेंडर तात्काळ बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेचा तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे
