ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टॅनिस्लॉस स्वामी यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून भीमा कोरेगाव प्रकरणातून जामीन मंजूर करा

0

मनमाड – ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टॅनिस्लॉस स्वामी यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून भीमा कोरेगाव प्रकरणातून जामीन मंजूर करणे करिता व नि:पक्ष तपास होणे, ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टॅनिस्लॉस स्वामी,वय वर्षे 83 यांना भारतीय तपास यंत्रणेने अटक केली आहे.तपास यंत्रणेच्या तपास कार्यामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करू इच्छित नाही. फादरांचे वय व त्यांना असलेले आजार याचा विचार करून भारतीय न्यायव्यवस्था अंतर्गत असलेल्या प्रावधानानुसार त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा याकरिता आम्ही हे निवेदन देन्यात आले ,झारखंड या राज्यात फादर स्टॅनिस्लॉस स्वानमी यांनी आदिवासी,गोरगरीब, दीनदलित यांच्या करिता जे कार्य केले आहे व जे कार्य करीत आहेत ते संपूर्ण जगापासून लपलेले नाही. ते गोरगरीब, आदिवासी, दीनदलित यांच्या हक्कासाठी तसेच निसर्ग संवर्धन व्हावे या करिता अहोरात्र श्रम करीत आहेत. त्यांचे हे कार्य मानवी दृष्टिकोनातून मानवामध्ये समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करणारे आहे आणि ते नेहमीच आदिवासी लोकांच्या न्याय्य हक्कासाठी कार्यरत आहेत.
आमचा राज्यघटनेवर विश्वास आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरी एका संन्याशाला शिक्षा होणार नाही हे तत्त्व आपण स्वीकारले आहे.83 वर्षीय,पक्षाघात आजाराने ग्रस्त फादर स्टॅनिस्लॉस स्वामी यांना भीमा-कोरेगाव प्रकरणात संबंध दर्शवत अटक केले गेल्याचे समजते.याबाबत समाजाच्या भावना तीव्र संतापजनक आहेत.
ख्रिश्चन समाज शांतीप्रिय असला तरी फादर स्टॅनिस्लॉस स्वामी यांच्या अटकेमुळे समाजाच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत.शिवाय त्यामुळे जगभरात भारताच्या प्रतिमेला निश्चितच बाधा पोहोचली आहे.भिमा-कोरेगाव प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ख-या गुन्हेगारांविरुद्ध शीघ्र कार्यवाही व्हावी ही आमचीही भावना आहे.
भारतीय न्याय व्यवस्थेला आम्ही विनंती करत आहोत की,आदिवासी व गोरगरीब जनतेचा आवाज फादर स्टॅनिस्लॉस स्वामी यांची जामीनावर लवकरात लवकर सुटका करावी. असे निवेदन देण्यात आले , यावेळी धर्मगुरू संदीप वाघमारे ,अविनाश पारखे व इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here