अनॉन कोविड गर्भवती माता प्रसुती केंद्रात जन्मले पहिले बाळ

0

मुंबई – पनवेल कोळीवाडा येथे नॉन कोविड गर्भवती माता प्रसुती केंद्र सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश आले आहे.
खुप प्रयास केले आणि हे हॉस्पिटल सुरू केले. मात्र वांझोट्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक मग मी दुर्लक्ष केले. त्यानंतर महिनाभर ते हॉस्पिटल बंद राहिले. श्रेय घेणारे आणि त्यांना देणारे गायब… हॉस्पिटल बंद.
शेवटी पुन्हा प्रयत्न केले. नर्स आणल्या. तीन कर्मचारी दिले आणि पुन्हा हॉस्पिटल सुरू केले.
आता टेक्निशियन, रुग्णवाहिका आणि इतर सुविधांसाठी प्रयत्न सुरू आहेत.
काल एका मातेने पहिल्या बाळाला जन्म दिला. आज एका गर्भवती मातेला तिथे उपचार करून एमजीएमला पाठविले आहे. कारण बाळंतपणानंतर बच्चूला आयसीयू लागेल.
… आणि आनंदाची बातमी म्हणजे तिथे तासाभरात सिजर झाली, गुटगुटीत बाळ जन्माला आले. मुलगा झाला. त्याच्या वडिलांनी सहकार्याबद्दल रात्री दीड वाजता आभार मानले.
भविष्यात पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ही व्यवस्था, सिजर यंत्रणा उपलब्ध करून देवू.
धन्यवाद डॉ. स्वाती नाईक, डॉ. नागनाथ येमपल्ले सर आणि सर्व कर्मचारी.
– कांतीलाल कडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here