एस. टी. बस सेवा सुरू

0

मनमाड – दिनांक २०.०८.२० गुरुवार पासून एस.टी.बसेस सुरू
गेल्या पाच महिन्यापासून एस.टी.प्रवाशी बस सेवा बंद होती.परंतु उद्यापासून महाराष्ट्रात एस.टी.बससेवा सुरू होत आहे.एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करतील तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.
परंतु खाजगी बसने प्रवास केल्यास ई- पास बंधनकारक आहे.
प्रवाशांना मास्क बंधनकारक राहील मास्क नसल्यास रुमाल नाका तोंडाला बांधणे बंधनकारक राहील
प्रवाशांना तालुक्यातून, जिल्ह्यातून, व महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी जाता येता येईल.
सर्व प्रकारचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, या सर्व प्रवाशांना प्रवास करता येईल. कुठलीही भाडेवाढ न करता प्रवास करता येईल.
एस.टी.प्रवाशी सेवा फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित असून.महाराष्ट्रा बाहेर इतर राज्यात प्रवासासाठी परवानगी नाही.
🚩🚩🏹🙏🏻🙏🏻🏹🚩🚩
आ.मयूर बोरसे
शिवसेना शहरप्रमुख,मनमाड
आ.जाफर मिर्झा
शिवसेना उपशहरप्रमुख, मनमाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here