सिल्लोड ( प्रतिनिधी :विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती विद्यालय तळणी येथील व्हाट्सअप फेकबुक वर ग्रुपवर देण्यात येणाऱ्या अभ्यासा पासून वंचित असणाऱ्या विदयार्थ्यांना संस्थेचे सचिव अशोक गरुड यांच्या प्रेरणेने एस. एस. राठोड यांच्या प्रयत्नातून प्राचार्य सतीश देशमुख यांच्या हस्ते गणित भूमिती, नवोदय, शिष्यवृत्ती अशी सर्व समावेशक तयार केलेल्या कृतीपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाने शाळा बंद आहे. परंतु शाळा बंद असतांनाही शिक्षण विभागाने कठोर पावले उचलत शाळा बंद पण शिक्षण सुरू या तत्वानुसार व्हाट्सप फेसबुक द्वारे विदयार्थी कायम स्वरूपी प्रवाहात ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षा पद्धती सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. ती शिक्षा पद्धती सुरू असताना बरेच विदयार्थी ज्या पालकाकांडे व्हाट्सउप व्यवस्था नाही किंवा साधा मोबाइल आहे असे विदयार्थी अभ्यासा पासून वंचित आहे अशा 5 वि ते 7 वि च्या विद्यार्थ्यां साठी कृतीपत्रिका तयार करून त्या सोशल डिस्टनसिंग चा नियम पाळत वाटप करण्यात आल्या.
यावेळी पालक नारायण राजपूत सहशिक्षक जनार्धन कुंटे, नंदू हिरे, लाड,लिपिक काथार व कर्मचारी उपस्थित होते