
सिल्लोड ( प्रतिनिधी :विनोद हिंगमीरे ) असोसिएशन ऑफ डिजिटल मिडिया अँड इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल संघटनेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी झी – 24 न्यूज लाईव्ह चे मुख्य संपादक योगेश बनकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अद्वैत व महादेव हरणे यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्री बनकर यांची निवड केली.श्री योगेश बनकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन योगेश बनकर यांची फेरनिवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्यांचे पत्रकार व मित्र मंडळ आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
