
मनमाड : अनेक वर्षांपासून अयोध्या येथील प्रभु श्री राम मंदिराच्या प्रतीक्षेत असनाऱ्या करोडो राम भक्तांचे स्वप्न आज पुर्णत्वास आले. या निमित्ताने देशातील अनेक राम भक्तांकडुन आंनद उत्सव साजरा करण्यात आला.मनमाड मधील देखील अनेक राम भक्तांकडून कोरोना विषाणूच्या प्रसाराचा विचार करून सोशलडीस्टनसिंग चे सर्व नियम पाळून विविध कार्यक्रम साजरे केले. श्री राम मंदिरा मध्ये सकाळी श्री राम मूर्तीचा अभिषेक करुन आरती करण्यात आली , शहरातील अनेक मंदिरांच्या परिसरात रांगोळया काढून मंदिरावर विद्युतरोषणाई करण्यात आली. शहरातील अनेक नागरिकांनी आपल्या घरांवर भगव्या ध्वजा बरोबर गुढ्या उभारल्या. शहरातील ऐकात्मता चोका मध्ये प्रभु श्री राम यांची भव्य प्रतिमा राम भक्तांकडुन लावण्यात आली. या वेळेस राम भक्तांकडुन नागरिकांना लाडू ,पेढे वाटण्यात आले.ओम मित्र मंडळा द्वारे शहरातील आयोध्या येथे कारसेवेला गेलेल्या कार सेवकांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केेला,
