सुमित कैलास जगताप याने ५०७ वी रॅक मिळवत उज्वल यश संपादन

0

नासिक- दिनांक : -०५/०८/२०२० नाशिक ग्रामीण पोलीस दलातील चांदवड पो.स्टे.चे ASI कैलास जगताप यांचा मुलगा सुमित याची IPS पदी निवड – मा.पोलीस अधीक्षक डॉ . आरती सिंह मॅडम यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात सत्कार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( युपीएससी ) परिक्षेचा निकाल मंगळवार दि . ०४ ऑगस्ट २०२० रोजी जाहिर झाला . या परिक्षेत नाशिक ग्रामीण पोलीस दलात चांदवड पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहा.पोलीस उपनिरीक्षक ( ASI ) श्री.कैलास जगताप यांचा मुलगा चि . सुमित कैलास जगताप याने ५०७ वी रॅक मिळवत उज्वल यश संपादन केले असुन त्याची IPS पदी निवड झाली आहे . याबद्दल नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात काल रोजी त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक मा.डॉ.आरती सिंह मॅडम यांचे हस्ते चि . सुमित जगताप व सपोउनि श्री.कैलास जगताप यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला . यावेळी अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री . संदिप घुगे सो , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शमिष्ठा वालावलकर मॅडम , उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री.समीर साळवे , पोलीस उपअधीक्षक मुख्यालय श्री . शामकुमार निपुंगे यांचेसह मुख्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . सपोउनि कैलास जगताप व त्यांचे सर्व परिवाराचे यावेळी ग्रामीण पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले . पोलीस दलात कार्यरत असतांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे पोलीसांना पुर्णत : लक्ष देता येत नाही , परंतु सपोउनि कैलास जगताप यांचा मुलगा सुमित याने केमिकल इंजिनियरींग ही पदवी संपादित करून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरू केला . युपीएससी परिक्षेत पुर्व , मुख्य परिक्षा व मुलाखत हे टप्पे पार करतांना खडतर प्रवासातुन न डगमगता अभ्यास केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे सुमितने सांगितले . जिल्हयातील पोलीस कर्मचा – यांच्या पाल्यांसाठी सुमित हा एक आदर्श असुन जिद्द व चिकाटी असेल तर यश नक्कीच संपादित होते , असे यावेळी मा.पोलीस अधीक्षक मॅडम यांनी सांगितले . तसेच सुमित यास त्याचे भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या . नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जगताप परिवारावर सोशल मिडीयासह सर्वच स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here