
मनमाड- मनमाड येथे विद्याताई जगताप यांच्या निवासस्थानी दिनांक 2/8/2020रोजी समितीची बैठक व पदग्रहण सोहळा पार पडला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून
कार्यक्रम घेण्यात आला.
या बैठकीस समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
व मनमाड शहराची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या मनमाड शहर अध्यक्षा
विद्याताई सुनिल जगताप,
कार्याध्यक्षा ज्योतीताई डेविड अरुण, उपाध्यक्षा सुशिलाताई बाळकृष्ण राऊत, संगिताताई संतोष सांगळे, चिटणीस शिरीण अहमद खान,संघटक सावित्रीबाई लालधारी यादव ,मायाताई झाल्टे यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्त करण्यात आले.
तर तालुका कर्याध्यक्ष सुरेखाताई ढाके व जिल्हा प्रसिध्दीप्रमुख हिरामण मनोहर यांची पत्रक देऊन नियुक्ती करण्यात आली.
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती ही सर्व जातिधर्माच्या लोकांसाठी खुली आहे. यात जातिभेद, वर्णभेद, लिंगभेद असा कोनताही भेदभाव होत नाही. जिथे अन्याय होईल तिथे न्याय देण्याचे काम समितिचे पदाधिकारी जाऊन करतात.असे प्रतिपादन समितिचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी या प्रसंगी केले.
यावेळी समितीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव वाघ, तालुका अध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, समाजसेवक पिंटुभाऊ वाघ,शिलाताई केदारे रेखाताई जाधव,सुशिलाताई धिवर, अरुणा घुसळे,सुनिता निरभवणे,शिला सोनवणे, सारिका पगारे,बंटी वाघ, कृष्णा जगताप आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन हिरामण मनोहर यांनी केले तर पिंटुभाऊ वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.
राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
