निसर्ग वारी’…नवरा-नवरी डोंगर

0

मनमाड : हिरवे-हिरवे गार गालीचे , हरीत तृणांच्या मखमलीचे….त्या सुंदर मखमलीवरती , फुलराणी ती खेळत होती…गोड निळ्या वातावरणात , अव्याज मने डोलत होती…या कविते प्रमाणे निसर्गाने सध्या आपल्या हिरव्या रंगाची उधळण ही प्रत्येक डोंगर आणि पठारांवर केलेली आहे. पावसाळा ऋतू सुरु झाला की निसर्गाचे सुंदर रूप अनुभवायला मिळत असते.मनमाड आणि परिसरात यंदा चांगल्या पावसाला सुरुवात झाल्याने परिसरातील निसर्गाचे खूपच सुंदर रूप बघायला मिळत आहे .शहरातील अनेक तरुण व निसर्ग प्रेमी हे परिसरातील डोंगर रांगेवर भटकंती करत आहे .मनमाड परिसर हा चारीही बाजुंनी डोंगर रंगांनी समृद्ध असा परिसर आहे या मूळे मनमाडच्या आजूबाजूच्या परिसरतील वातावरण हे पर्यटनासाठी आणि भटकंती साठी खूपच छान आहे.
आज आपण अशाच एका डोंगराची माहिती घेऊ या, मनमाड पासून चांदवड कडे जातांना साधारण 6 ते 7 किलोमीटर वरील डाव्या बाजूला असणारा नवरा-नवरी डोंगर.चढाई साठी साधारण सोपा असणारा परंतु दगड आणि गवत या मुळे पायवाट निसटती असल्याने काळजी पूर्वक चढाई करावी लागते.सध्या पाऊस चांगला होत असल्याने येथील वातावरण खुपच सुंदर आहे.पायवाटेने पुढे जाताना अनेक उमलेली रान फुले आणि त्या वर बसणारी फुलपाखरे मन मोहून टाकतात.सकाळी डोंगरावर चढाई करतांना होणारे सूर्योदयाच्या दर्शन हे डोळ्याचे पारणे फेडते. डोंगराच्या आजूबाजूला असणारे दाट झाडी आणि त्यातून वाहणारे छोट्या नाल्यातून पाणी खुप रमणीय वाटते. डोंगर चढून वर माथ्यावर गेल्या नंतर तिथून दिसणारे चारही बाजूंचे दृश्य हे खुपच नयन-रम्य दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here