सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) शहरातील शिवाजीनगर परिसरात रहाणाऱ्या एका
विवाहितेने विष प्रशान करून आत्महत्या केल्याची घटना रविवार (ता.26) रोजी घडली.याप्रकरणी विवाहितेच्या भावाने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयत विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेस पाच वर्षांची मुलगी विजया व दोन वर्षांचा मुलगा वेदांत अशी
दोन अपत्ये आहेत.सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार शहरातील शिवाजीनगर परिसरात विशाल जंजाळ कुटुंबासोबत रहातात. शनिवार (ता.25) रोजी दुपारी त्यांची पत्नी कविता जंजाळ (वय.29) यांनी विष प्राशन केले. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तब्येत बिघडल्यामुळे
त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतू त्यांचा मृत्यू झाला. मयत विवाहितेच्या
भावाने सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून बहीणीने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. सात
वर्षांपूर्वी कविताचा विवाह विशालसोबत झाला होता. त्यानंतर दोन वर्ष सासरच्या मंडळींनी तिला
चांगले वागविले. त्यानंतर मात्र प्लॉट घेण्यासाठी माहेराहुन दोन लाख रूपये घेऊन ये असे म्हणत
तिचा मानसिक व शाररिक छळ करीत होते. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची
तक्रार देण्यात आल्यानंतर मयतेच्या पती योगेश तेजराव जंजाळ, सासरे तेजराव भाऊराव जंजाळ,
सासू गंगुबाई तेजराव जंजाळ, नणंद प्रियंका जंजाळ, अश्विनी विशाल उबरहंडे, नंदेचा पती विशाल
उबरहंडे सर्व रा.सिल्लोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीसह, सासु, सासरे
व नणंद यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास फौजदार सुनिल अंधारे करित आहेत.
विवाहितेच्या नातेवाइकांनी गुन्हा दाखल करुण आरोपींना अटक करित नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात
घेऊन अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. घटनेची
गांभीर्य बघता सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजेंद्र बोकडे यांनी तात्काळ गुन्हा
दाखल करित संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर नातेवाईकांनी विवाहितेचे प्रेत ताब्यात घेऊन
चिंचपूर (ता.सिल्लोड) येथे पोलिस बंदोबस्तात तणावपुर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.