रोटरी महिला मंडळाने घेतली महिलांच्या आरोग्याची दखल

0

मनमाड (हर्षद गद्रे, मनमाड प्रतिनिधी ) रोटरी महिला मंडळाने शहरातील गरीब मजुरांच्या परिसरात जाऊन आरोग्यविषयक जनजागृती केली . महिलांना सॅनिटरी नॅपकिन, कापडी मास्क, सॅनिटायझर, आदींचे वाटप केले. वागदर्डी रोडवरील मजुरांच्या दारी जाऊन रोटरी महिला मंडळाच्या सदस्यांनी महिलांचे प्रबोधन केले. रोटरी महिला मंडळाने महिलांच्या आरोग्याची दखल घेतली. योग शिक्षिका स्वाती मुळे  यांनी  वस्तीवरील महिलांमध्ये  आरोग्यविषयक माहिती दीली. गरजू महिलांना कापडी मास्क , सॅनिटायझर बॉटल , सॅनिटारी पॅडचे , स्वाती मुळे  व विनया काकडे  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

प्रमुख अतिथींचा परिचय  सचिव मयुरी काकडे, यांनी करून दिला, आभार अध्‍यक्षा पूर्णिमा माने यांनी मानले.उपक्रमास रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य गुरुजितसिंग कांत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राविंद्रकौर कांत , चंदा डमरे, लीला सदगिर ,चित्रा गुजराथी ,सूलभा काकडे आदि सदस्या  उपस्थित होत्या . सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here