दवाखान्यांची अवाजवी बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याचे निर्देश- राजेश टोपे

0

सोलापुर- सामान्य नागरिक कोरोनाच्या आजाराने बेजार झाला आहे. त्यात खासगी दवाखान्यांकडून अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याने अनेक जण हैराण झाले झाले आहेत. भरमसाठ बिलाला आता लगाम घालण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत.कोविड-१९ विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. सोलापुरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यावेळी टोपे यांनी हे निर्देश दिले आहेत.खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. मात्र आता खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल. शासनाच्या नियमानुसार योग्य आहे का याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जाईल. शासनाने निश्चित केलेले दर केवळ कोरोना उपचारासाठी नाही तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. सर्वच रोगांवरील उपचारासाठी आहेत, असे टोपे यांनी सांगितेल.कोरोना विषाणू तपासणीचे अहवाल चोवीस तासात आलाच पाहिजे याबाबत खात्री करा. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. सोलापूर शहरातील सर्व दवाखान्यातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड रिक्त आहेत, याची माहिती लोकांना कळण्यासाठी डॅशबोर्ड तयार करा, अशा सूचना  टोपे यांनी यावेळी दिल्या…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here