जिल्हा अधिक्षक सुनिल कडासने यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव

0

मनमाड -नगरपालिका सभागृहात कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाच-लुचपत विरोधी विभागाचे जिल्हा अधिक्षक सुनिल कडासने यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत कडासने सोबत आलेल्या युनानी डॉ.नी मार्गदर्शन करून विषाणू संसर्ग रोखण्यासाठी चे सर्व उपाययोजना सांगण्यात आली.दरम्यान शासनाने सुनिल कडासने यांची समन्वयक म्हणून मालेगाव येथे नियुक्ती करून कोरोना चा विळख्यात असलेल्या मालेगाव ची सुटका करण्यात यश मिळविल्याने त्यांचे मार्गदर्शन मनमाड करांना मोलाचे ठरणार आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यसाठी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.या प्रसंगी संतोष बळीद(उप जिल्हा प्रमुख,शिवसेना),गणेश धात्रक,राजाभाऊ आहिरे,पाटील,,राजेंद्र पारीक,डॉ.शिंगी,प्रतिष्ठित व्यापारी, पत्रकार व सर्व नगरपालिका अधिकारी,सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here