
मनमाड – महाराष्ट्रातील संत मालिकेतील एक थोर संत श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची आज पुण्यतिथी.संत सावता माळी यांचा जन्म इ.स.1250 साली झाला असून समाधी इ.स.1295 साली घेतली.अरण (ता. माढा , जि. सोलापुर)हे सावतोबांचे मुळ गाव. संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव म्हणतात : धन्य ते अरण , रत्नांचीच खाण ! जन्मला निधान सावता तो ! सावता सागर , प्रेमाचा आगर ! घेतला अवतार माळ्या घरी ! सावतोबांचे आजोबा पंढरीचे वारकरी होते ते नेहमी पंढरीची वारी करत असे , त्या नंतर सावतोबांचे वडील आणि नंतर स्वतः सावतोबा आशा तिन्ही पिढ्या या पंढरीचे भक्त आणि वारकरी होते.संत सावता माळी हे एक मराठी संत कवी होते , त्यांनी अनेक अभंग लिहिले.सावतोबांचा मुळ व्यवसाय हा शेती होता त्यांनी आपल्या कामातच नेहेमी विठोबाचे रूप बघितले.संत सावता माळी पुण्यतिथी दरवर्षी शहरामध्ये म. फुले माळी समाज मित्र मंडळामार्फत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते परंतु या वर्षी कोरोना वाढत्या प्रभावमुळे यंदाची पुण्यतिथी ही साधेपणाने साजरी करण्यात आली , सकाळी दत्त मंदिर परिसरातील सावता माळी मंदिरामध्ये सावतोबांच्या मूर्तीची अभिषेक पुजन , सत्यनारायण पुजन करून प्रसाद वाटप करण्यात आला.
