पोस्टमन चे महत्व कमी झालेले नाही.

0

मनमाड – ( प्रतिनिधी- हर्षद गद्रे )  वेळ व काळ बदलला तरी पोस्टमन चे महत्व कमी झालेले नाही. कोरोना संकटाच्या या काळात जसे डॉक्टर, पॅरमेडिकल स्टाफ आपला  स्टाफ आपली सेवा देत आहे तसेच पोस्टमन पण  आपली सेवा देत आहे. ही सेवा देत असताना ह्या पोस्टमन ने स्वतःचे संरक्षण करणे सुद्दा गरजेचे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन रोटरी क्लब मनमाडने  दिनांक 14/07/20 रोजी मनमाड पोस्ट ऑफिस मधील सर्व 9 पोस्टमनना फेस शिल्ड, मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले.कोरोना संकटात ते देत असलेल्या सेवेची स्तुती केली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड शहरातील प्रख्यात पत्रकार संदीप देशपांडे व उपाली परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोस्ट मास्तर  बाळासाहेब खैरनार व आय पी जोशी उपस्थित होते.पोस्ट मास्तर बाळासाहेब खैरनार ह्यानी रोटरी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष लवकुमार माने व सेक्रेटरी आनंद काकडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. रोटरीचे सदस्य देवराम सदगीर, सुभाष गुजराथी, गुरजित कांत, सुभाष डमरे, राजू गुप्ता, पोपट बेदमुथा , दिनेश  बेदमुथा, डॉ भूषण शर्मा, डॉ सुमित शर्मा व डॉ धीरज बरडीया उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here