शहरातील सलून व्यावसायिकांचा “हत्यारे बंद”

0

मनमाड : शहरात वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन परिसरातील सर्व नाभिक सलून व्यवसाय व कारागीर यांची जनरल मिटिंग काल श्रीसंत सेना महाराज सभागृहा मध्ये संपन्न झाली यामध्ये मनमाड आणि परिसरातील असलेले सर्व गाव खेडे- येथील सर्व सलुन दुकान कोरोना संक्रमणा पासून दूर राहावे व कोणत्याही सलून कारागीरास कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी सर्वानुमते दुकान आठ दिवस म्हणजे बुधवार ते बुधवार पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच प्रमाणे या आठ दिवसाच्या कालावधी मध्ये कोणीही कोणाच्याही घरी जाऊन दाढी-कटिंग करू नये सदरचा बंद हा *हत्यारे बंद असा पाळण्यात यावा असा निर्णय कालच्या मीटिंग मध्ये सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. .वरील झालेल्या निर्णय हा पुढील आदेश येई पर्यंत लागू राहील. या बंद कालावधी मध्ये जर कोणी काम करताना किंवा घरी जाऊन काम करताना आढळल्यास त्याच्यावर मनमाड नाभिक समाज नजर ठेवून आहे व तसे आढळल्यास त्यास योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय कालच्या झालेल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. घरी रहा ! सुरक्षित रहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here