मनमाड़ रेल्वे हॉस्पिटल येथे ओपीडी सुरु ठेवा

0

मनमाड़ –  रेल्वे हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याचा प्रस्ताव असल्याच्या पार्श्वभुमीवर ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लाइज असोशियशनच्या शिष्टमंडलाने भुसावल येथील आरोग्य अधीक्षक डॉ श्रवण कुमार यांची मनमाड़ भेटी दरम्यान भेट घेऊन मनमाड़ रेल्वे हॉस्पिटलची ओपीडी सेवा सुरु ठेवावी,अशी मागणी करण्यात आली आहे,या हॉस्पिटलवर तीन हजार कर्मचारी,दीड हजार सेवानिवृत्त पेंशनर व त्यांचा परिवार अवलंबुन आहे.त्यामुळे येथील ओपीडी बंद केल्यास रेल्वे कामगरांच्या आरोग्या बाबत समस्या निर्माण होउ शकतात असे सूचवले आहे.तसेच या हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या रिक्त जागा बाबत लक्ष्य वेधले असता डॉ श्रवण कुमार यांनी मनमाड़ हॉस्पिटल येथे दोन सीएमपी(डॉक्टर) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु असून ते त्वरित नियुक्त केले जाणार आहे अशी माहिती दिली, तसेच मनमाड़ रेल्वे कामगारांसाठी गंभीर कोविड 19 संसर्गाबाबत नाशिक येथील कोविड रुग्णालयाशी टाय-अप करून सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.यावेळी शिष्ट मंडलात एससी/एसटी असोचे झोनल अति सचिव सतीश केदारे,ओपन लाइन शाखेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड़, कारखाना शाखेचे सचिव प्रवीण आहिरे,विजय गेडाम,सागर गरुड़ इत्यादि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here