
नांदगाव ( प्रतिनिधी- निखील मोरे) शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे बाहेर गावहुन ये -जा करत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत धोकादायक असून या संदर्भात नांदगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयी थांबण्याची मागणी केली होती. परंतु असे असतांना देखील अधिकारी आणि कर्मचारी हे बाहेर गावहून ये जा करत असून खुद्द नगरपालिकेचे कर्मचारी हेच बाहेर गावाहून ये-जा करत असतानाच कोरोना बधितांची संपर्कात आल्याने संपूर्ण नगरपालिकेला कोरन्टीन करावे लागले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव नगरपालिकेतील येवला येथे राहत असलेले एक कर्मचारी हे हाताला दुखापत झाल्याने रजेवर होते. संबंधीत कर्मचारी शुक्रवारी कामावर रुजू होण्यासाठी आले होते. या दरम्यान त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्वरित संबंधित कर्मचाऱ्यांला कोरंटाईन होण्यास सांगितले सदर कर्मचारी हा पालिकेत येणाऱ्या जाणाऱ्याचे टेंपरेचर व पल्स मोजण्याचे काम करत होते त्यामुळे त्यांचा संबंध कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि नागरिकांशी आला असल्याने नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्यासह २३ कार्यालयीन कर्मचाऱ्यांना होमकोरंटाईन करण्यात आहे.सुदैवाने पाणीपुरवठा आणि सफाई कर्मचारी हे संबंधितांच्या संपर्कात आलेले नाही. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यानाच कोरंटाईन होण्याची वेळ आल्याने नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
