नाशिक : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी सर डॉ. एम.एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय ई-लेफलेट डिझायनिंग स्पर्धेत श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या “एस.एन.पी.टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी “या संस्थेच्या द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये सोनिका शर्मा, श्रुतीका चौधरी आणि मोनाली बागुल यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रु.१५००/- चे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. विशाल एस. गुलेचा आणि सर्व शिक्षकवृंदया तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. नरेंद्रभाई ठाक्कर, उपाध्यक्ष मा. प्रकाशभाई पटेल, कार्यालयीन सचिव मा. देवेंद्रभाई पटेल, एस.एन.पी.टी. सचिव मा. उपेंद्रभाई दिनानी व संयुक्त सचिव मा. अभयभाई चौकशी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Home Breaking News श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या” एस.एन.पी.टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या “विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय यश नाशिक







