नाशिक श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत डिप्लोमा इन फार्मसीचा निकाल शंभर टक्के; विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश संपन्न,श्री.पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी. तसेच निकाल शंभर टक्के लागून विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश. द्वितीय वर्ष डिप्लोमा इन फार्मसीमध्ये चौधरी पूजा हिने 82.82% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच घाले दर्शनाने 80.46% गुणांसह द्वितीय क्रमांक तर चव्हाण देवेंद्रने 78.91% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. व प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसीमध्ये निकिता मंडल हिने 74.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकावर सूर्यवंशी समृद्ध 70.50% असून तिसऱ्या क्रमांकावर डिंबर श्रद्धा या विद्यार्थिनीचा समावेश आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशभाई पटेल, सचिव मा. श्री. देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी, महाविद्यालयाचे दाता विश्वस्त मा. श्री राजेश भाई ठक्कर तसेच प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा आणि सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Home Breaking News श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत...







