Home Breaking News हनुमान टाकळी येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायती कडून पाथर्डी पोलिस निरीक्षक...

हनुमान टाकळी येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायती कडून पाथर्डी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना निवेदन सादर

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंदे बंद करावेत म्हणून पाथर्डी पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांना निवेदन सादर केले आहे. टाकळी गावातील महिला मंडळाच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले आहे.या महीलांनी गावातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांची तोंडी नावे पोलीसांना सांगितली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पाथर्डी तालुक्यातील मौजे हनुमान टाकळी येथे अनेक प्रकारच्या अवैध धंद्यांचा सुकाळ झाला आहे. गावात हे अवैध धंदे खुलेपणाने सुरू आहेत.प्रामुख्याने टाकळी परीसरात सर्रासपणे अवैध दारू विक्री चालू असुन दररोज दारू पिणारे तळीराम महाशय हे आपल्या कुटुंबातील महीलांना मारहाण करून अनेकींचे संसार उध्वस्त झाले आहेत. या अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.या अवैध धंद्याचा लहान मुलांवर अतिशय विपरीत परिणाम होत आहे.आपण योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही पुन्हा आमच्या लहान मुला बाळांना पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये घेऊन येवून ठीय्या आंदोलन करणार असल्याचे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हनुमान टाकळी ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर दिलेल्या निवेदनात सरपंच सौ.मीना संजय शिरसाट आणि ग्रामसेवक अशोक नारायण फुंदे यांच्या सह गावातील अनेक ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.पाथर्डी पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना हनुमान टाकळी येथील महिला सविता गायकवाड,चंद्रकला बर्डे,नंदा दगडखैर,शहाबाई दगडखैर,सुनिता उदार, गयाबाई बर्डे,भामाबाई बर्डे, हिराबाई बर्डे, रंजना बर्डे, सीमा दगडखैर,इंदाबाई बावणे,रुक्मिणी अशोक आव्हाड, यांनी या निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.राषट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाच्या पाथर्डी तालुका अध्यक्षा सौ. मनिषा डांभे यांनी या प्रकरणी लक्ष वेधून पोलिस निरीक्षक यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यांच्या समवेत कासार पिंपळगाव येथील आरोग्य विभागाच्या शेळके आणि राजळे या दोन महीला उपस्थित होत्या. पोलिस निरीक्षक पुजारी साहेब यांनी पाथर्डी तालुक्यातील कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांना तालुक्यातील महीलांच्या तक्रारीला सामोरे जावे लागले आहे.या प्रकरणी या भागातील बीट हवालदारांना तातडीने कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.नविन पोलीस निरीक्षक नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here