मनमाड : भारताचा मुकूट असलेल्या जम्मू काश्मिर येथील बैसरन खोऱ्यात पहलगाम येथे मंगळवारी दि. २२/०४/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास अज्ञात अतिरेक्यांनी निष्याप असणाऱ्या हिन्दू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला.सदरील हल्ला हा भ्याड प्रवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या व लष्करी गनवेश परीधान करून आलेल्या जैश-ए- मोहम्मद या अतीरेकी संघटनेशी संबंधीत असलेल्या टी.आर.एफ. या पाकीस्तान प्रणीत दहशतवादी संघटनेनी जबाबदारी स्वीकारल्याचे प्रसिद्ध झाले. अशा या हल्ल्यात. सुमारे २८ ते ३० पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. तसेच अनेक पर्यटक हे गंभीर जखमी असून अनेक कुटुंब हया हल्ल्यात उध्दस्त झालेले आहे. हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना ह्या समूळ नष्ट करण्याची गरज आहे.शिवसेना मनमाड शहराच्यावतीने ह्या हल्ल्याचा जळजळीत निषेध करीत असून ह्या हल्ल्याचा प्रतीशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मनमाडचे सर्कल अधिकारी झोपले तात्या यांना देण्यात आले.
त्या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा संघटक नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, महेंद्र शिरसाठ, कैलास गवळी, सादिक पठाण, अमिन पटेल, सागर शिरसाठ, महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, लाला नागरे, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, प्रदीप साळवे, निलेश ताठे, मुकेश थोरात, ऋषिकांत आव्हाड, युनुस शेख, मोहसीन पठाण, किरण भामरे, सागर आव्हाड, जितू पगारे, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे तसेच सर्कल अधिकारी गुळवे साहेब उपस्थित होते.
Home Breaking News अज्ञात अतिरेक्यांनी निष्याप असणाऱ्या हिन्दू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार