Home Breaking News अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण सोहळ्याचे लोळेगावात आयोजन

अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण सोहळ्याचे लोळेगावात आयोजन

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) आळंदी पंढरीचे वारकरी सर्व ह.भ.प.वै.काशिनाथ बाबा,वै.नारायण बाबा विधाटे,वै.नारायण बाबा काळे,वै.आसाराम नाना नवघरे,वै.मधुकर अन्ना नवघरे,वै.पंढरीनाथ महाराज काळे,वै.हरीभाऊ महाराज पठाडे,वै.नारायण महाराज पठाडे,वै.शांताराम महाराज निकाळजे, यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प.उद्धव महाराज सबलस यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथे दिनांक २० ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ८ ते १२ गाथा भजन,सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ, रात्री ८ ते१० हरिकिर्तन आणि नंतर हरीजागर या प्रमाणे दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. पारायण काळात आखेगावचे ह.भ.प.राजाराम महाराज काटे, देवगडच्या दत्त देवस्थान चे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदजी महाराज,कळसपिंप्रीचे ह.भ.प.लक्ष्मण महाराज भवार,वडगाव (धावणवाडी)चे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बटुळे,कोरडगावचे ह.भ.प. प्रविण महाराज,वडुले येथील ह.भ.प.उद्धव महाराज सबलस,आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार व प्रबोधनकार ह.भ.प. निव्रुती महाराज इंदोरीकर यांची किर्तने होणार आहेत. दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता देवगडचे ह.भ.प.स्वामी प्रकाशानंदजी महाराज यांची मिरवणूक होणार आहे.दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ९ते११ या वेळेत आखेगावच्या जोग महाराज संस्थानचे प्रमुख ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांचे काल्याचे किर्तन होउन बापुसाहेब केदार आणि राजेंद्र केदार यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.सप्ताह काळात नवघरे, देवढे,घनवट, गालफाडे,बुचकुल, शिनगारे,डमाळे,जाधव,आघाव,नेहुल,काळे, पठाडे,लेंडाळ,ठुबे, डोंगरे या परीवाराच्या वतीने दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी जोहरापूर,सामनगाव, वडुले,लोळेगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ आणि लोळेगाव भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here