Home Breaking News कोपरे येथे मळगंगा देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!

कोपरे येथे मळगंगा देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथील मळगंगा देवी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता मळगंगा देवीच्या मंदिरात काठीची विधीवत पूजा करून काठीचा उंच ध्वज उभारण्यात आला होता.तेव्हापासुन गावातील अनेक घरातील सुवासिनी महीला मळगंगा देवीच्या मंदिरात अनुष्ठानासाठी ठाण मांडून बसल्या होत्या. त्या काळात महीलांनी उपवास करून जागर केला.चैत्र पौर्णिमेनंतर येणारा मंगळवार हा यात्रेतील मुख्य दिवस असतो. या दिवशी सायंकाळी पाच वाजता गावातील सुवासिनी महीला यांच्या हस्ते वाजत गाजत मानाचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.आणि सर्व महीलांच्या वतीने महाआरती करण्यात आली.छबिन्याच्या निमित्ताने रात्री नउ वाजता माता मळगंगा देवीच्या काठीची आणि पालखिची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी शोभेच्या दारूसह तोफांच्या सलामीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ही मिरवणूक संपन्न झाली. मळगंगा देवीच्या मंदिरावर आकर्षक वीद्युत रोषणाई करण्यात आली होती.दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी नऊ वाजता कोपरे येथील हनुमान मंदिरा समोर ग्रामीण कलाकारांचा हजेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी अनेक कलाकारांना गावातील यात्रा कमेटीच्या वतीने पंचांच्या हस्ते ईनाम देण्यात आले. तसेच सायंकाळी चार वाजता मळगंगा देवीच्या यात्रा कमेटीच्या वतीने भव्य दिव्य असा जिल्ह्यातील नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात आला होता. गावातील छोट्या रेवडी पैलवानासह ईतर राज्यातून मोठ मोठे नामांकित पैलवान या हंगाम्यात हजेरी लावण्यासाठी आले होते. यात्रा कमेटीच्या वतीने प्रथम गावातील ज्येष्ठ नागरिक अशोक बापुराव आव्हाड यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.आणि हगाम्याची सुरूवात करण्यात आली. अनेक लहान मोठ्या मल्लांनी या हगाम्यात कुस्त्या जिंकून ईनाम पटकावले.महीला पैलवानांना ही रोख स्वरूपात ईनाम देण्यात आले.यात्रेतील हगाम्यासाठी हनुमान टाकळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि कोपरे गावच्या सरपंच सौभाग्यवती छायाताई उघडे यांचे पती भाऊसाहेब उघडे, डॉक्टर संभाजीराव आव्हाड, माजी सरपंच रमेश एकनाथराव आव्हाड,भरतशेठ आंधळे, दिपक धनवटे, अशोक आव्हाड, गहिनीनाथ आव्हाड, मेजर विनोद खंबायत, शंकरराव उघडे,नाथा खरात,आदिनाथ पांढरे, सदाशिव वाघमोडे,भरत उघडे,राजू धनवटे,म्हातारदेव उघडे,शिवाजी कुंडलीक उघडे,जेष्ठ पैलवान उत्तमराव आंधळे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक कुस्ती प्रेमी आवर्जून उपस्थित होते. पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी नागरे आणि पोलिस कॉन्स्टेबल निलेशबापू गुंड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेने आणि सद्भावनेतून साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here